पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित 12 तालुक्यांमध्ये 218 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Fair Price Shop Ration Shop Permission Application Process Starts Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना फॉर्म आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील आणि कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळवले आहे.
अधिक वाचा –
– व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले
– बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ
– जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंधराशे सायकलप्रेमींचा सहभाग