भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी गुरुवारी (5 जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 79 लाख 51 हजार 420 मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून यादीत 74 हजार 470 मतदारसंख्येची भर पडली आहे. ( Total 79 Lakh 51 Thousand 420 Voters In Pune district An Increase 74 Thousand 470 Number Of New Voters )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मतदार यादीमध्ये एकुण 74 हजार 470 मतदारांची वाढ झालीये, ज्यात पुरुष मतदार संख्या 35 हजार 598 इतकी, महिला मतदार संख्या 38 हजार 721 इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या 151 ने वाढलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदार संघात एकूण 79 लाख 51 हजार 420 इतके मतदार समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 41 लाख 66 हजार 265, महिला मतदारांची संख्या 37 लाख 84 हजार 660 व तृतीय पंथी मतददारांची संख्या 495 इतकी आहे.
अंतिम मतदार यादी पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन दिलेली असल्याने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. तसेच https://www.nvsp.in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
मतदार यादीत अद्यापही नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी https://www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावे किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म नं. 6 भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही डॉ. देशमुख यांनी कळवले आहे.
अधिक वाचा –
– फायद्याची बातमी! स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, वाचा प्रक्रिया । Ration Shop Permission
– जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंधराशे सायकलप्रेमींचा सहभाग