व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अवैध मद्य विक्री आणि अवैध मद्य सेवन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम, पुणे जिल्ह्यात 29 गुन्ह्यांची नोंद । Pune District News

अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्यावतीने वर्ष 2021-22 पेक्षा वर्ष 2022-23 मध्ये एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 435 ने वाढ झालेली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Illegal-Liquor

File Image


महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे 68 व 84 कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात 7 ते 9 जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून एकूण 29 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे. ( Special Campaign Against Illegal Liquor Sale And Alcohol Consumption In Pune District )

सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 25 आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण 37 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये अशा प्रकारचे एकूण 35 गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यामधील एकूण 71 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून 1 लाख 27 हजार 800 रुपये इतका दंड करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच, अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीचे समुळ उच्चाटण करण्यासोबतच गुन्हेगारांना वचक बसविण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये 382 सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकूण 17 प्रस्ताव व मोक्काअंतर्गत 2 प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. अधिक दराने मद्य विक्री करणारे दारु विक्री दुकान व देशी दारु बार अनुज्ञाप्तीधारकाविरुद्ध एकुण 10 विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्यावतीने वर्ष 2021-22 पेक्षा वर्ष 2022-23 मध्ये एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 435 ने वाढ झालेली आहे. तर अटक आरोपी संख्येमध्ये 596 ने वाढ झालेली आहे. जप्त वाहनांच्या संख्येत 72 ने वाढ झाली असून जप्त मुद्देमालाच्या किंमतीमध्ये 5 कोटी 86 लाख 40 हजार 662 रुपये इतकी वाढ झालेली आहे.

पुणे जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 आणि दुरध्वनी क्रमांक 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपुत यांनी केले आहे.

अधिक वाचा –

– वडगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु, वाचा सविस्तर 
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन


Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

Next Post

ग्रामपंचायत लढवली ना? मग हिशोब सादर करा, 20 जानेवारीपर्यंत हिशोब सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election-Expenses

ग्रामपंचायत लढवली ना? मग हिशोब सादर करा, 20 जानेवारीपर्यंत हिशोब सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
Lecture by senior writer Prabhakar Oval on Equality and Brotherhood in Society concluded at Vadgaon Nagar Panchayat

“महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने वडगावची भूमी पावन झाली, ऐतिहासिक वडगाव शहराचा इतिहास लिहिला जावा”

April 14, 2026
Aboli Dhore lays foundation stone for various development works in Vadgaon Maval

Vadgaon Maval : नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या हस्ते वडगावात १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

April 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.