व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेन शाळेत पवनमावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन

मावळ विकास मंडळ संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण आजिवली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून पवन मावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 20, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Shri-Dnyaneshwar-Vidyaniketan-School-Ajivali

Photo : Ganesh Patil


मावळ विकास मंडळ संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण आजिवली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून पवन मावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि शाळेच्या संचालिका स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, इनरव्हील रोटरी क्लब सदस्या स्वातीताई दाभाडे आणि माळवाडीच्या सरपंच पल्लवीताई दाभाडे पाटील आदी यावेळी उपस्थित होत्या. वर्षाराणी दगडे, जया पाटील यांचा सत्कार स्नेहल बाळसराफ यांच्या हस्ते करण्यात आला. ( Turmeric Kunku Ceremony And Competitions For Female Parents of Pavan Maval At Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन करताना बाळसराफ यांनी सार्वजनिक हळदीकुंकू माध्यमातून महिलांचे संघटन करणे, हा हेतू असल्याचे सांगून महिलांनी कन्या आणि पुत्र यांच्यात कोणताही फरक न करता मुलींना शिक्षण दिले पाहिजे, त्यांना पायावर उभे केले पाहिजे असे सांगून जोपर्यंत महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत समाजामध्ये त्यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अन्याय होतच राहतील. त्यामुळे महिलांना आत्मविश्वास देण्याची नितांत गरज आहे, असे मत मांडले.

यानंतर मा उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी ग्रामीण भागातील शिकत असलेल्या विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. महिलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण या विषयी खंत व्यक्त केली आणि कॅन्सर होऊ नये म्हणून HPV VACCINATION CERVICAL CANCER सर्व विद्यार्थिनींना मोफत देण्यात येईल असे आश्वासन दिले.

स्वाती दाभाडे आणि माळवाडीच्या सरपंच पल्लवी दाभाडे यांनीही शिक्षणाचे महत्त्व आणि आपल्या समोर आलेल्या सम्यस्या यांना कशा प्रकारे सामोरे जावे, याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणेच याही वर्षी देखील संगीत खुर्ची आणि उखाणे या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यासाठी महिलांचा प्रतिसाद उत्तम होता.

हेही वाचा – स्तुत्य उपक्रम! कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीकडून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला 7 लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट

संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक मनीषा घरदाळे, द्वितीय क्रमांक मंदा लायगुडे तर तृतीय क्रमांक स्वाती शिंदे यांनी मिळवला. तसेच उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रीती माव्हानकर, द्वितीय क्रमांक दिपाली शिंदे, तृतीय क्रमांक सुषमा ओव्हाळ यांनी पटकावला. स्वाती दाभाडे आणि पल्लवी दाभाडे तसेच वर्षाराणी दगडे यांनी शाळेच्या प्रगतीविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी समाधान व्यक्त करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ( Turmeric Kunku Ceremony And Competitions For Female Parents of Pavan Maval At Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali )

शाळेचे मुख्याध्यापक रमेश आरगडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी देशपांडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन वर्षा बारबोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ आदर्श शिक्षक गणेश पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

अधिक वाचा –

– दुधिवरे गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; ग्रामस्थांनी ई-श्रम कार्ड, आभा कार्ड योजनांचा घेतला लाभ
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’
– पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी भाजपाचे पंढरीनाथ भिलारे बिनविरोध

Next Post

बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे कार्ला येथील शाळेला अद्ययावत संगणक कक्ष भेट, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन, पाणपोईचेही भुमीपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke-Inaugurated-Computer-Room

बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे कार्ला येथील शाळेला अद्ययावत संगणक कक्ष भेट, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन, पाणपोईचेही भुमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.