संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांच्या सीएसआर उपक्रमातून आणि शारदा फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना मोफत संगणक संच वितरण समारंभ बुधवारी (दिनांक 25 जानेवारी) रोजी संपन्न झाला. यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके देखील उपस्थित होते. ( Distribution Of Free Computer Sets To Primary Schools In Mulshi Taluka In Presence Of MP Supriya Sule MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे याचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रतिकूल परिस्थितीत शिवराजने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद असुन उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.
सिनेक्रॉन कंपनी सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करत आहे. मावळ-मुळशीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन आगामी काळात देखील कंपनीकडून भरीव सहकार्य केले जाईल, अशी अपेक्षा यावेळी आमदार शेळकेंनी व्यक्त केली. माजी सभापती पांडाभाऊ ओझरकर, मा सरपंच बाबाजी शेळके, सरचिटणीस रा. यु. काँ. निलेश भोईर, सुखदेव तापकीर हे शारदा फाऊंडेशनच्या माध्यमातून उत्तम सामाजिक उपक्रम राबवत असून त्यांच्या कार्याला यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाला खासदार सुळे, आमदार शेळके यांच्या समवेत माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे रणजीत शिवतरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, राजाभाऊ हगवणे, सुनिल चांदेरे, दगडू करंजावणे, सविताताई दगडे, कोमल साखरे, सिनेक्रॉन कंपनीचे असोसिएट डायरेक्टर रफिक नदाफ, कायदेशीर सल्लागार सैफन मुजावर, अॅडमिन मॅनेजर राजेश आगळे, सागर साखरे, बाळासाहेब गोडांबे, सुरेश हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते. ( Distribution Of Free Computer Sets To Primary Schools In Mulshi Taluka In Presence Of MP Supriya Sule MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान
– अंधाऱ्या रात्री दुचाकीसह दरीत कोसळलेल्या तरुणाला वाचवण्याचा थरार, मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा मंदिराजवळील घटना
– स्तुत्य उपक्रम! बऊर गावात शासकीय योजनांबद्दल जाणीव जागृती कार्यक्रम