मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात एक भीषण अपघात झाला आहे. जवण – तुंग रस्त्यावर जवण गावाजवळ एका बोलेरो वाहनाचा रविवार (29 जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. सदर अपघातात गाडीतील प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी अपघाताची माहिती मिळताच स्वतः बचावकार्य सुरु केले आणि जखमींना गाडीबाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले. ( Accident on Javan Tung Road in Pavan Maval Area of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, बोलेरो गाडी जवणजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण हुकले. चालक नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले. गाडीवरील नियंत्रण हुकल्याने वळणावरील शेतात ही कार पलटी होऊन थेट शेतातील विहिरीत कोसळली. यात गाडीतील प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात पाठवले. सुदैवाने यात कोणीही मृत पावलेले नाही. परंतू, जवण-तुंग रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक तसेच बेदकारपणे वाहने चालवणारे वाहनचालक यांची संख्या सातत्याने वाढत असून त्यावर पोलिस प्रशासनाने काही उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिक लोक करत आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात – पाहा व्हिडिओ
– चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा जोतिबा फुलेंसोबत तुलना; म्हणाल्या…