खोपोली नगर परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान 2.0 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत स्वच्छतेविषयक प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धा खोपोली नगरपरिषद कार्यालयातील आरोग्य विभागात आयोजित करण्यात आली होती.
स्वच्छते विषयक प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धा उपक्रमात खोपोली नगरपालिका परिसरातील पाच खाजगी शाळा आणि पाच नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांनी सहभाग नोंदवला होता. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, कचऱ्याचे विघटन, कचऱ्याचा पुनर्वापर, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन असे विषय या उपक्रमासाठी निवडले गेले होते. गुणवंत विद्यार्थ्यानी अत्यंत प्रगल्भपणे या उपक्रमा मागील हेतू जाणून घेत, तंत्रशुद्ध मांडणी करून आपले कौशल्य दाखवून दिले. ( Competition And Exhibition Related To Waste Management By Khopoli Nagar Parishad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या स्पर्धेत जे. सी. मेमोरियल स्कूल (महिंद्रा सॅनियो) प्रथम , कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल द्वितीय आणि छत्रपती शाहू महाराज विद्यालयाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. स्पर्धेत यशस्वी आणि सहभागी झालेल्या सर्वच शाळांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दूरे यांच्या हस्ते शहरातील राजकिय तसेच सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.
खोपोली नगर परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नोडल ऑफिसर दिपक खेबडे, शहर समन्वयक भक्ती साठेलकर, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली होती.
अधिक वाचा –
– खोपोली शहरात नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि कर्करोग तपासणी शिबिर संपन्न
– ‘तुकोबारायांना त्यांची पत्नी मारायची, म्हणून…’, बागेश्वरधामच्या धीरेंद्र महाराजाचे वादग्रस्त विधान; तुकोबांचे वंशज म्हणाले…
– चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा जोतिबा फुलेंसोबत तुलना; म्हणाल्या…