केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची सुरुवातीला महत्वाची माहिती….
अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या “अमृतकाळातलं” पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पात महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा…
- 81 लाख बचत गट भारतात सक्रीय असून त्यांना भरीव मदत करणार. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या विकाससाठी सरकार कटिबद्ध आहे.
- लाभार्थ्यांच्या खात्यात थेट मदत देण्यावर सरकारचा भर असून यापुढेही गरीब जनतेला सरकार 1 वर्ष मोफत धान्य देणार आहे.
- डाळींसाठी विशेष हब तयार केले जाणार असून सरकार कापसातून शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
- शेतकऱ्यांसाठी सरकार सर्वाधिका काम करत असून शेतकरी, राज्य सरकार आणि उद्योगांचा समन्वय यातून विकास, प्रगती करण्यावर भर देत आहे.
- ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.
- कृषीपूरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे.
- छोट्या छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली.
- देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाही सितारमन यांनी डिजीटल पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला.
अधिक वाचा –
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारची आदिवासी समुदायांसाठी मोठी घोषणा, देशात पीएम पीव्हीटीजी योजना राबवणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारचे ‘मिशन सप्तर्षी’, ‘या’ सात घटकांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या