हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त दिनांक 28 जानेवारी 2023 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हिंदूहृदयसम्राट चषक 2023 शिवसेना लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी, युवासेना चिटणीस पुणे जिल्हा शाम सुतार, शिवसेना सल्लागार लोणावळा शहर रामभाऊ थरकुडे तसेच समर्थ स्पोर्ट्स चे प्रो.प्रा. शिक्षक सोमनाथ ठोंबरे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली पार पडला. ( Hinduhridaysamrat Cup 2023 Cricket Tournament In Lonavala city By Shivsena )
स्पर्धेचा विजेता संघ म्हणजेच हिंदूहृदयसम्राट चषक 2023 चा मानकरी ‘संदिप परंडवाल व गणेश विधाटे देहूरोड येथील 11 चॅलेंजर’ हा संघ ठरला. साखळी सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर ह्या संघाने फायनलमध्ये धडक मारत किताब आपल्या नावे केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्पर्धेत एकूण पाच क्रमांक ठेवण्यात आले होते ते खालीलप्रमाणे….
प्रथम – संदिप परंडवाल व गणेश विधाटे 11 चॅंलेंजर संघ (देहुरोड)
द्वितीय – श्रीराम गवळीवाडा संघ (लोणावळा)
तृतीय – कोटेश्वरवाडी D-11 संघ (तळेगाव)
चतुर्थ – स्वराज्य संघ (उर्से, मावळ)
पाचवा – तळेगाव ट्रॅकर्स (तळेगाव)
उत्कृष्ट सामनावीर – डी-११ संघ तळेगावचा कर्णधार तसेच मावळ क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष मनोज दाभाडे हे ठरले, यासाठी त्यांना सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार उपस्थित होते. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख लोणावळा शहर बाळासाहेब फाटक, मा नगरसेवक निखिल कविश्वर, मा नगरसेवक शिवदास पिल्ले, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे व्हिपीएस महाविद्यालयाचे प्राचार्य दरेकर, शहर संघटक सुभाष डेहनकर, उपशहरप्रमुख संजय भोईर, प्रकाश पाठारे, मनेष पवार, विभाग संघटक परेश बेडेकर, उद्योजक धनंजय साळुंखे, उद्योजक राजकुमार केंद्रे तालुका संघटक अनिल ओव्हाळ, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, शिवसेना वाहतुक सेनेचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण दाभाडे, युवासेनेचे आमित कदम, विभाग प्रमुख कमर अन्सारी उपविभागप्रमुख संजय शिंदे, शिवसैनिक उत्तम ठाकर, आनील वाघमारे, गोपी चव्हाण, पराग आण्णा औरंगे आदी उपस्थित होते.
तसेच या स्पर्धेतील समालोचनासाठी अक्षय चव्हाण व कल्पेश ठोंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून कर्जत चे चौधरी सर व देहुरोड चे फ्रांसीस सर यांची नेमणूक करण्यात आली होती. स्कोअर बुक चे काम सुजल सुतार व विनोद पेशकर यांनी चोख व अचुकपणे पार पाडले. तसेच संपूर्ण पाच दिवस या कार्यक्रमासाठी 11 हनुमान संघ ठोंबरेवाडी मधील सुनील साठे, पंकज देशमुख, सचिन लाल, यश राऊत, ओमकार सुतार, चिंतन सुतार, जय मेने, श्रेयश दाभाडे, गणेश कांबळे यांनी वेळ दिल्याबद्दल आयोजकांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाविकासआघाडीचं ठरलं, कसब्याची जागा काँग्रेसकडे आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढणार
– पाकचे माजी ‘हुकूमशहा’ परवेज मुशर्रफ यांचे निधन! लष्करप्रमुख ते राष्ट्रपती अन् मरताना देशद्रोही, वाचा भारतावर कारगिल लादणाऱ्याबद्दल