महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प गुरुवारी (दिनांक 9 मार्च) रोजी विधीमंडळात मांडण्यात आला. अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विकासकामांनाही निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील अनेक रस्त्यांकरिता शिंदे सरकारने भरीव निधी दिला असल्याची माहिती मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात मावळमधील रस्त्यांना भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे त्यांनी आभार मानले आहेत. ( Government of Maharashtra Budget 2023 Funding for Roads in Maval Taluka Information By MP Shrirang Barane )
हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी खास तरतूद, ‘या’ कार्यासाठी तब्बल 25 कोटी जाहीर
मावळमधील खालील रस्त्यांना निधी ;
1) सोमाटणे बेबडओहोळे, शिवणे, कडधे रस्ता प्रजिमा 28 कि.मी 5/700 ते 10/500 रस्त्याची सुधारणा, रुंदीकरण करणे (बेबडओहोळे ते पिंपळखुंटे) ता. मावळ – 5 कोटी 32 लाख रुपये
2) सोमाटणे बेबड ओहोळे शिवणे कडधे प्रजिमा 28 कि.मी 13/600 ते 15/600 रस्ता व पूल करणे (मळवंडी ढोरे ते थूगांव) – 6 कोटी 52 लक्ष
3) सोमाटणे बेबड ओहोळे शिवणे कडधे प्रजिमा 28 कि.मी. 20/0 ते 23/00 रस्ता करणे (डोणे फाटा ते ओहोळे) – 4 कोटी 890 लक्ष
4) दारूंब्रे आढले डोणे येळसे प्रजिमा 105 किमी 14/500 ते 14/500 रस्ता आणि पूल करणे – 7 कोटी 340 लक्ष
5) पानशेत तव – गडले धामण – ओहळे प्रजिमा 112 00/000 ते 2/00 रस्ता करणे – 4 कोटी
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याला काय मिळालं अन् काय राहिलं? लवकरच समजणार! आजी-माजी आमदार घेणार पत्रकार परिषद
– ‘मोफत गणवेश’, शिंदे सरकारचं राज्यातील विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट! शिक्षणसेवकांच्या पगारातही भरघोस वाढ, वाचा अधिक
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतली जखमी शिवभक्तांची भेट; शिवभक्तांना आधार देत डॉक्टरांना दिल्या महत्वाच्या सुचना