रस्त्याच्या बाजूला धोकादायकरित्या उभ्या केलेल्या ट्रकला धडकून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यात घडली आहे. नवलाख उंबरेजवळील मिंडेवाडी गावाच्या (तालुका मावळ, जिल्हा पुणे) हद्दीत बुधवार (15 मार्च) रोजी ही घटना घडली.
दत्ता गंगाराम खरात (वय – 33, रा. शिरदे, ता. मावळ) आणि लहू भरत बगाड ( वय – 22, रा. शिरदे, ता. मावळ) अशी मृत पावलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. ( Two Bikers Killed In Collision With Truck Incidents In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, तळेगाव-चाकण एमआयडीसी जोडरस्त्यावर ही घटना घडली. मिंडेवाडी गावाच्या हद्दीत ट्रक (क्रमांक एम.एच. 14 के.यू. 1231 हा धोकादायकरित्या उभा केला होता. त्याला दुचाकी (क्रमांक एम.एच. 14 के.एल.) ची पाठीमागून जोरात धडक बसली. यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी रमेश कोंडिबा खरात यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक मुकुटकुमार साधुसरन शर्मा (वय – 40, रा. कोलकत्ता) याला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग : क्रॅश बॅरियर ठरतायेत गंभीर अपघाताचे कारण; सलग दुसऱ्या दिवशी द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात
– तळेगावात अपघातग्रस्त घोडीला जीवदान, वन्यजीव रक्षक मावळ आणि गोशाळेच्या प्राणीमित्रांनी दाखवली तत्परता – व्हिडिओ
– वडगाव शहराला ‘सुरक्षेच्या तिसऱ्या डोळ्याची’ गरज; भाजपा महिला मोर्चाचे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला निवदेन