मावळ तालुक्यातील मौजे शिरगाव गावाच्या हद्दीत सोमवार (दिनांक 20 मार्च) रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करुन चार महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत.
दिनांक 20 मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास मौजे शिरगाव गावच्या हददीतील पवना नदीच्या बाजूला मोहन अरगडे यांच्या शेताजवळील मोकळ्या जागेत आणि कंजारभट्ट वस्तीच्या पुर्वेस पुणे मुंबई एक्सप्रेस रोडच्या जवळ (ता. मावळ जि. पुणे) इथे ही कारवाई करण्यात आली. ( Police Raid Illegal Liquor Factory Near Pavana River In Shirgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल दिलीप विश्वनाथ राठोड (वय 30 वर्षे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात चार महिला आरोपींवर महा दारुबंदी अधिनियम कलम 65 (सी), (एफ), 83 अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. चारही महिला आरोपी या शिरगाव ( सर्व रा. शिरगाव कंजारभटट वस्ती ता मावळ जि पुणे) येथील असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख, वेळी आणि ठिकाणी आरोपी महिला या बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारु तयार करण्याकरीता लावलेले गुळ मिश्रित कच्चे रसायन 4,81,000 रुपये किंमतीचे एका जमिनीच्या खड्यामध्ये आणि लोखंडी पात्रामध्ये भिजत घातलेले आढळून आले. पोलिस हवालदार साबळे हे या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– नातवासाठी कायपण! मावळात चिमुकल्याच्या नामकरण सोहळ्याला भरवला कुस्त्यांचा आखाडा; इनामात दुभती म्हैस अन् चांदीची गदा
– पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश