‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणा-या ‘टॉप-टेन’मध्ये मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. 148 वेळा चर्चेत सहभाग आणि 508 प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच पहिल्या स्थानी या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आहे. एकूण महाराष्ट्रातील चार खासदार टॉप टेन मध्ये आहे, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. ( Maval Shiv Sena MP Shrirang Barne Included In Top 10 MP Of The Country NCP Supriya Sule At First Place )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यानुसार सतराव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे दुस-या स्थानावर आहेत. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत. भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन असे खासदार पहिल्या दहाच्या यादी आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आत्तापर्यंत सतराव्या लोकसभेत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. सोळाव्या लोकसभेत देखील कामकाजात खासदार बारणे अग्रभागी होते. सतराव्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. खासदार श्रीरंग बारणे हे सातत्याने मावळातील प्रश्न लोकसभेत मांडतात. त्याबाबत आवाज उठवितात. या कामगिरीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना सलग सातवेळा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
लोकांमध्ये राहणारा, लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा, जमिनीवर राहून काम करणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ओळख आहे. मागील नऊ वर्षांपासून मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. खासदार बारणे पहिल्या दहामध्ये आल्याने मतदारसंघातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या यादीत अग्रभागी आहेत. तर, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.
“मावळच्या जनतेने माझ्यावर सलग दोन वेळा विश्वास टाकला. देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरेल असे कामकाज करत आहे. संसदेतील कामकाजात सक्रियपणे सहभाग घेवून मतदारसंघातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवितो. प्रश्न मार्गी लावून घेतो. सतराव्या लोकसभेत आत्तापर्यंत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. संसदेतील या कामगिरीमुळे देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये माझा समावेश आहे. यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढेही मावळच्या जनतेची अशीच सेवा करत राहील.” अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी दिली.
अधिक वाचा –
– ‘एक इशारा अन् साफ झाला माहीमचा किनारा’, राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर शिंदे सरकारची तत्काळ कारवाई, ‘ती’ मजार हटवली
– शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई, बेकायदा मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला, टेम्पोत तब्बल 5 टन मांस