महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (मंगळवार, दिनांक 16 मे) पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रामुख्याने आयटीआयमधील शिल्पनिदेशकांची पदे कायम ठेवून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25 हजार रुपये करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते 25 हजार रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा 297 कंत्राटी निदेशकांना होईल. यापूर्वी त्यांना 15 हजार रुपये मानधन मिळायचे. सध्या या आयटीआयमध्ये 297 निदेशक आहेत. ( Eknath Shinde government decision Substantial increase in remuneration of ITI contract directors will now get 25 thousand rupees )
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecisions pic.twitter.com/JlUhTLsENl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
???? #मंत्रिमंडळनिर्णय –
✅ आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार २५ हजार रुपये मानधन.
✅ अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय… pic.twitter.com/lkCy4artV9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
राज्यातील मनपा क्षेत्रातील आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित आयटीआयमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट 2010 पासून सुरु करण्यासाठी एकूण 1500 शिक्षकीय पदांना 2010 मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. कंत्राटी शिल्प निदेशकांच्या सेवा 2010 पासून 2022 पर्यंत 12 वर्ष इतक्या झाल्या असून वाढलेली महागाई बघता आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा पुढे ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण जाहीर, राज्यातील 4 हजारहून गृहनिर्माण संस्थांचा प्रश्न मार्गी
– पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन; दोषींवर कठोर कारवाईची कुटुंबीयांची मागणी । Kishor Aware Murder Case