वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या स्वच्छतागृहांची वडगाव नगरपंचायतीच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी पाहणी केली. ( order for immediate repair of public toilets in Vadgaon maval city )
दुरावस्थेत व मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांमध्ये अनेक ठिकाणी सोयी-सुविधांचा मोठा अभाव दिसून आला. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरपंचायत माध्यमातून स्वच्छतागृहांची त्वरित डागडुजी व दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा सूचना स्वच्छता अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. याप्रसंगी टेकचंद नेमाडे, रवी साबळे, दिगंबर भांडे आदी जण उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! वनविभागाकडून वेहेरगाव, कार्ला भागात सौरदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांना बसण्यासाठी बाकडे
– ‘भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान मावळ’चा चौथा वर्धापन दिन दुर्ग इंदोरी इथे उत्साहात साजरा