मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील बोरवली आणि कांब्रे येथील विद्यार्थीनींची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी लायन्स क्लब ऑफ भोसरी यांच्या वतीने नवरात्रोत्सव कालावधीत सायकलींचे वाटप करण्यात आले. ( Free Bicycle Distribution To Students )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आहेर गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी शैलजा सांगळे, सरपंच नामदेव शेलार, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रामदास वाडेकर, दिलीप आलम, उल्हास पिंगळे, उमेश पिंगळे, बाळासाहेब ठिकडे आदी उपस्थित होते.
‘सायकल बँक’ या थीम वर आधारित ही मदत करण्यात आली. तसेच आता हा फक्त पहिल्या टप्पा असून पुढील टप्यात आणखीन सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. ( Free Bicycle Distribution To Students At Borivali and Kambre village Maval )
अधिक वाचा –
तुंग किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी क्लायम्बिंग रोप उपलब्ध, ‘यांनी’ केली मोलाची मदत I Tung Fort Maval
शिळींब ग्रामपंचायतीला गांधी जयंतीचा विसर; गावातील तरुणांनी बंद कार्यालयासमोर साजरी केली गांधी जयंती, तालुक्यात होतेय चर्चा