लोणावळा शहर आणि परिसरात स्विमिंग पूलमध्ये बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना काही थांबताना किंवा कमी होताना दिसत नाही. मंगळवारी (3 जानेवारी) रोजी रात्री उशीरा लोणावळा शहराजवळील जुना खंडाळा येथे एका खासगी बंगल्यातील स्विमिंग पूल मध्ये बुडून एका 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. निखिल संपत निकम (वय 22, रा. चिंचवड) असे मृत युवकाचे नाव आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निखिल आणि काही मित्र लोणावळ्यात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. या दरम्यान रात्री सर्वांनी उशीरापर्यंत पार्टी केली. तेव्हा जवळपास सर्वांनीच मद्य प्राशन केले होते. यावेळी स्विमिंग पूलमध्ये बुडून निखीलचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या अपघाताची चौकशी लोणावळा शहर पोलिस करत आहेत. ( A 22 Year Old Youth From Chinchwad Drowned In Swimming Pool At Bungalow News Khandala Lonavala City )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळाला नवा भिडू, ‘या’ पक्षासोबत युतीची अधिकृत घोषणा
– महावितरण वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत निघाला तोडगा । Mahavitaran Employee Strike Called Off