Dainik Maval News : कासारसाई येथील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर सोमाटणे नजीक अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने हा अपघात झाला. ट्रॉली पटली होऊन ऊस रस्त्यावर विखुरल्याने काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सध्या ऊस तोड हंगाम सुरु असून कारखाना क्षेत्रातून ऊसाच्या गाड्या भरभरून कारखान्याच्या दिशेने धाव घेत आहेत. अशात काही वाहन चालक वाहनात क्षमतेपेक्षा अधिक ऊस टाकून वाहने दामटत असल्याने अपघात होत आहेत. मागील आठवड्याभरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होण्याची ही तिसरी घटना असल्याने यामुळे रस्ते वाहतूक व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ! कुरवंडे येथील 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप । Maval News
– अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पिंपळोली गावच्या हद्दीतील घटना । Maval News
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– कुसवलीतील सहारा वृद्धाश्रमात रंगली अनुभवाच्या कवितांची व मुक्त संवादाची मैफल । Maval News