व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सह्याद्रीचा दुर्गसेवक हरपला! अमित जाचक यांचे इंदुरीजवळ अपघाती निधन, मावळ तालुक्यातील युवावर्गावर शोककळा

मृत्यूचा सापळाच बनलेल्या तळेगाव चाकण महामार्गावर आणखीन किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार?

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 24, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Amit-Jachak-Maval

Photo Courtesy - Team Dainik Maval


सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रीय असलेले अमित विष्णु जाचक (वय 31, रा. कान्हे) यांचे बुधवारी रात्री अपघाती निधन झाले. तळेगाव चाकण रस्त्यावर इंदुरी इथे रस्ते अपघातात त्यांचे निधन झाले. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अमित जाचक हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने जनरल रुग्णालय तळेगाव दाभाडे इथे नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अमित यांच्या अकाली निधनाने तालुक्यातील युवा वर्गाला मोठा धक्का बसला आहे. ( Accidental death of Amit Vishnu Jachak near Talegaon Dabhade Induri )

सह्याद्री प्रतिष्ठान मावळमध्ये अमित जाचक हे सक्रीय होते. तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये समाकार्यातही ते अग्रेसर राहत होते. एक हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अमित यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, पत्नी आणि अन्य कुटुंबीय आहेत. त्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला असून आक्रोशाला सीमा राहिलेली नाही. तर, त्यांच्या मित्रवर्गालाही मोठा हादरा बसला आहे.

मृत्यूचा सापळाच बनलेल्या तळेगाव चाकण महामार्गावर आणखीन किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार, असा प्रश्न आता संतप्त नागरिक करत आहे. लूटमार, वेगाने वाहन चालवून सामन्यांचे बळी घेणे, बेदकारपणे वाहन चालवणे अनेक ठिकाणी खड्डे अशा समस्यांनी गांजलेल्या या रस्त्यावर विकासाचे यान कधी उतरवणार, हा सवाल येथील सामान्य जनता आता करत आहेत. ( Accidental death of Amit Vishnu Jachak near Talegaon Dabhade Induri )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval
– ‘संकल्प नशामुक्ती अभियान’ – मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या 8 नशेखोरांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala Crime
– ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आणि काही तासात नवीन शिक्षक रुजू झाले; शिळींब गावातील हटके आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा


Previous Post

लोणावळा ग्रामीण पोलिसांचा नशेखोरांवर कारवाईचा दणका! 11 जणांना खावी लागणार जेलची हवा । Lonavala Crime

Next Post

मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळाची वार्षिक सभा कान्हे इथे संपन्न; संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kumbhar-Samojonnati-Mandal

मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळाची वार्षिक सभा कान्हे इथे संपन्न; संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.