न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला न्यालयात हजर करून माघारी परत आणत असताना, त्याने रेल्वेतून उडी मारून पोबारा केल्याची घटना तळेगाव जवळ घडली आहे. दिल्लीतील एका न्यायालयात हजर करून पुण्याला परत आणताना आरोपीने बेगडेवाडी रेल्वे स्थानक येथे रेल्वेतून उडी मारली. विशाल हर्षद शर्मा असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आरोपी विशाल शर्मा एका गुन्ह्यात अटकेत होता. तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान त्याला दिल्ली येथील गुरुग्राम न्यायालयात पुणे कोर्ट कंपनीने हजर केले होते. त्यानंतर दिल्ली येथून त्याला रेल्वेने पुणे येथे आणले जात होते. ( accused escaped by jumping from train at Begdewadi station Talegaon )
दिल्ली ते मुंबई प्रवास आल्यानंतर त्याला मुंबईहून पुण्यात आणताना तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाच्या पुढे बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे थांबली असता आरोपी विशाल शर्माने बेडीसह रेल्वेतून उडी मारली आणि पळ काढला. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता तो मिळून आला नाही. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अधिक वाचा –
– सीबीएसई बोर्ड परीक्षेत तळेगावमधील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल ! सार्थक भांडवलकर प्रथम
– सासरच्या छळामुळे जगणे नकोसे झाल्याने विवाहितेची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पतीला अटक
– 9890099009 – मावळवासियांनो हा नंबर सेव्ह करा ! तुमच्या इथे पाण्याची समस्या असेल तर थेट आमदार सुनिल शेळकेंना करा फोन