बॅनरवर छायाचित्र न लावल्यामुळे कोथरूड परिसरात तलवार फिरवत दहशत पसरविणाऱ्या ओंकार ऊर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. धर्मवीर प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अक्षय गायकवाड (वय 22 रा. शास्त्रीनगर) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून कुडले याच्यासह साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. ( accused who terrorized by swinging sword was arrested by pune police in maval )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीत बॅनरवर फोटो लावला नसल्याच्या रागातून सराईत आरोपीने कोथरूड येथील शास्त्रीनगर भागात तलवार फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रकार केला होता. ओंकार ऊर्फ बाबा कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड,पुणे) याच्यासह एक जणावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्हा केल्यानंतर आरोपी पसार झाला होता आणि मागील दोन दिवसापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढून त्याला लोणावळा जवळील परिसरातील तुंग भागातील डोंगरातून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
कारवाईत गुन्हे शाखेचे पोलिस उपयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्यासह पोलिस हवालदार संजय आढारी, पो.हवा किरण ठवरे, पो.ना. विजय कांबळे, पो.ना. प्रफुल्ल चव्हाण, पो.शि. अशोक शेलार, पो.शि अमोल वाडकर, पो.शि वैभव रणपिसे, पो.शि मनोज सांगळे, सुधीर सोनवणे, राजेंद्र मारणे, शंकर संपते, सचिन आहीवळे, धनंजय ताजने त्यांच्या पथकाने तुंग परिसरात झाडीझुडपात तसेच डोंगराच्या कडी कपाऱ्यात भर पावसात मातीच्या कच्च्या रस्त्याने वाट काढत आरोपीचा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. ( accused who terrorized by swinging sword was arrested by pune police in maval )
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमिताने 1 ऑगस्ट रोजी मिरणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या बॅनरवर फोटो का लावला नाही म्हणून ओंकार ऊर्फ बाबा कुडले याने हातात तलवार फिरवली. तसेच तलवारीने साऊंड सिस्टीम ऑपरेटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो बाजूला सरकल्याने तो बचावला मात्र यात साऊंडचे नुकसान झाले. कुडले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या घटनेनंतर कोथरूड पोलिस ठाण्यावर नागरिकांनी मोर्चा काढल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कुरवंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना यादव बिनविरोध । Maval Politics
– महाराष्ट्राचा रानकवी हरपला..! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road