कान्हे (ता. मावळ) येथील प्रसिद्ध गाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यातील गाईवर अज्ञात इसमांनी अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दिनांक 1 मे) नेहमीप्रमाणे सकाळी पहाटे धार काढण्यासाठी अशोक सातकर यांनी आपल्या गोठ्याचे दार उघडताच हा प्रकार दिसून आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गोठ्यात धार काढण्यासाठी गेले असता तिथे धूराचा लोट दिसल्याने एकच धांदल उडाली. समोर असलेल्या 4 शर्यतीच्या बैलजोडी सोबत 10 म्हशी आणि 1 गावरान गाय बांधलेली असते. ही गाय गोठ्याच्या दर्शनीय जागी असल्यामुळेच हल्लेखोरांनी हातातील अॅसिड गाईच्या पोटावर आणि पायावर टाकले आणि निघून गेले. ह्या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Acid attack on cow in Kanhe village Maval )
तसेच गायीवर अॅसिड हल्ला झाला असला तरीही गायीच्या जवळच बैल जोड्या होत्या. सातकर हे प्रसिद्ध गाडा मालक आहेत. त्यामुळे हा हल्ला खरोखरच गायीवर होता की बैलावर याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. गायीवर सध्या इलाज चालू असून प्रकृती लवकर सुधारावी अशी आशा बाळगली जात आहे. मुक्या प्राण्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला होण्याचे कान्हे गावातील पहिलेच उदाहरण आहे.
अधिक वाचा –
– थंडगार पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तळेगावजवळ कुंडमळा येथे दोन मुलांचा बुडून मृत्यू । Maval News
– काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News