Dainik Maval News : तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) पोलीस स्टेशन हद्दीत मंत्रा सिटी रोडवर एका बियर शॉपीत सोमवारी (दि.10) रात्री लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Bribery Department) सापळा लावून एका हवालदाराला (police constable) पाच हजारांची लाच (bribe) घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश अरुण जाधव (वय 42) यांच्याविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बिअर शॉपी चालवत असून त्यांच्या दोन बिअर शॉपी आहेत. पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदारांकडे सदर बिअर शॉपी व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी प्रत्येक बिअर शॉपीचे 6 हजार प्रमाणे दोन बिअर शॉपीचे एकुण 12 हजार रुपयाची लाचेची मागणी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक यांच्यासाठी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येथे दिली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदारांकडे वरील कामासाठी तडजोडीअंती 5000 रुपयांची लाच मागणी करुन, 5000 (पाच हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. सतीश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7, 7 अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास याबाबत तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास सपंर्क साधण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विजयादशमी निमित्त वडगावमधील शिवभक्त तरुणांचा अनोखा उपक्रम; शिवकालीन वेशभूषेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा
– ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली तर्फे चाकण – वराळे नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ । Maval News
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी