पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे रोजी झालेल्या अपघातानंतर सर्व ठिकाणची पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याच धर्तीवर पर्यटनाचे शहर असलेल्या लोणावळा शहरात रात्रीच्यावेळी फिरणाऱ्या नशेबाजांवर कारवाई करावी, यासाठी पोलिसांना खास निवेदन देण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळ्यात रात्री उशिरा रस्त्यांवर फिरणाऱ्या नशेबाजांना पायबंद घालावा, तसेच अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत लोणावळा शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
- लोणावळा शहरातही रात्री-अपरात्री अनेक लोक मद्यपान आणि अमली पदार्थाचे सेवन केल्याने नशेमध्ये भरधाव वेगाने मोटारसायकल अथवा मोटारी फिरवित असतात. त्यामुळे भविष्यात गुन्हेगारी वाढून अनुचित घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच काही घटनांमुळे लोणावळा शहराच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत शहराचे नाव बदनाम होत असल्याने अपप्रवृत्तींना वेळीच आळा घालावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष अरुण लाड यांनी याबद्दलचे निवेदन लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना दिले. यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य दीपक कांबळे, संघटन मंत्री अर्जुन पाठारे, सरचिटणीस बाबू संपत, उपाध्यक्ष प्रफुल्ल काकडे, युवक अध्यक्ष प्रथमेश पाळेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय पारख, श्रावण चिकणे आदी उपस्थित होते. ( Action should be taken against drug addicts in Lonavala city BJP letter to police )
अधिक वाचा –
– मावळात मुलांपेक्षा मुलीच हुशार ! दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात मुलींनीच मारली बाजी । SSC Result Maval Taluka
– जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या ‘त्या’ अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !
– मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…