Dainik Maval News : देहू येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका टपरीवर कारवाई करीत ७ हजार २७९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवार ( दि. १ ऑक्टोबर) रोजी दुपारी करण्यात आली.
विष्णू एकनाथ वाघ (वय ५४, रा. देहू) असे कारवाईत अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बागसिराज जावेद यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू याने त्याच्या पान टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत ७ हजार २७९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय