Dainik Maval News : वडगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा नगरपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिले आहे.
वडगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चावा घेत असल्याने शहरातील लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, वाहनधारक भयभीत होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे.
भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, कुत्र्यांचे चिमुकल्यांवर हल्ले, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचा झुंडीने वावर दिवसेंदिवस वाढणारी मोकाट कुत्र्यांची संख्या ही बाब चिंताजनक होत आहे. मागील वर्षी मोकाट कुत्र्याच्या हल्याने जखमी झालेल्या मुलावर डोळ्याचे ऑपरेशन करण्याची वेळ आली.
ही मोकाट कुत्री शहरात येतात तरी कुठून? याचा शोध घेऊन त्वरित त्यावर नगरपंचायत प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा आशयाचे सुमारे ५० नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिले. यावेळी मावळ तालुका प्रभारी अतुल राऊत, मावळ युवक अध्यक्ष विशाल वहिले, वडगाव शहराध्यक्ष सोमनाथ धोंगडे, युवक अध्यक्ष सुनिल चव्हाण, सोशल मीडिया अध्यक्ष राहील तांबोळी आदी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena