व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 24, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ते’ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते त्याचे काय झाले ? – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

पवन मावळ, नाणे मावळनंतर आंदर मावळातही बापूसाहेब भेगडे यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
After Pavan Maval Nane Maval Bapu Bhegde in Andar Maval received big response from voters

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अण्णा उर्फ बापूसाहेब भेगडे यांना पवन मावळ, नाणे मावळनंतर आंदर मावळातही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळला आहे. आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांना मोठी रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण बांधील असणार आहोत, असे आश्वासन बापूसाहेब भेगडे यांनी तरुणांना दिले. विद्यमान आमदाराचे गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने आंदर मावळमधील समस्या वाढतच चालल्या आहेत.

बापूसाहेब भेगडे यांनी आज शनिवारी आंदर मावळातील पिंपरी, माळेगाव बुद्रुक, कुणेवाडी, कुणे, अनसुटे (मानकुली) पारिठेवाडी, इंगळून, किवळे, कशाळ, भोयरे, कोंडीवडे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आंबळे, कदमवाडी, शेटेवाडी, शिरे, मंगरूळ, गोळेवाडी आदी गावांना भेट देत प्रचारदौरा केला. यावेळी महिलांनी औक्षण करीत विजय तिलक लावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, शिवाजी आसवले, गणेश कल्हाटकर, शिवाजीराव पवार, अतिश परदेशी, बाबाजी गायकवाड, रोहिदास आसवले आदींसह ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी-माजी सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. आपण समस्या सोडविण्यास बांधील असल्याचे आश्वासन देत बापूसाहेब भेगडे म्हणाले, की विद्यमान आमदार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले ? पाच वर्षात शेतीला पाणी पुरवता आले नाही. जवळ धरण असतानाही शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. आपण प्रथम शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करू.

tata tiago ads may 2025

2019 ला मी एक वेगळा प्रयोग केला. पण तो प्रयोग फसला. गावकी भावकीचा विचार न करता झोकून देऊन सुनील शेळके यांचे काम केले होते. मात्र, ‘एकदाच आमदार करा ‘ हा शब्द त्यांनी न पाळता मोठा विश्वासघात केला. ही माझी मोठी चूक होती. मावळातील सर्व पक्ष मतप्रवाह विसरून माझ्यामागे ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळेच पैशाची गुर्मी व सत्तेची मस्ती जिरवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– पोलिसांनी जप्त केलेली रक्कम माझ्या व्यवसायाची, विरोधकांनी दबाव आणून कारवाई करण्यास भाग पाडले – सचिन मुऱ्हे
– मावळात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यालयातून 36 लाखांची रोकड जप्त, सोमाटणे येथे मोठी कारवाई । Maval Crime 


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळ तालुक्यात संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम केलंय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Assembly Elections Announced

मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka NCP Party announces appointment of new office bearers Suvarna Raut Suresh Dhotre

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ; महिला आघाडी अध्यक्षपदी सुवर्णा राऊत, तळेगाव शहराध्यक्षपदी सुरेश धोत्रे – पाहा संपूर्ण यादी

June 23, 2025
rally of NCP Party workers was held at Vadgaon Maval in \presence of MLA Sunil Shelke

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके

June 23, 2025
Police have recovered tempo stolen year ago from Aundholi village in Lonavala area

एका वर्षानंतर वाहनचोरीचा गुन्हा उलगडला, औंढोली गावातून चोरलेला टेम्पो वाघोलीत सापडला, एकाला अटक । Maval News

June 23, 2025
Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.