Dainik Maval News : एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की या विमानात २४२ प्रवासी होते.
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात विमानतळाजवळील मेघानीनगर या रहिवाशी भागात हे विमान कोसळले. एएनआय आणि पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान एअर इंडियाचे होते. उड्डाणावेळेस हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे विमान लंडनला जात होते. विमानात 242 प्रवासी होते, अशी माहिती एएनआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये दिली आहे.
विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती, अशी माहिती मिळत आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर