देशातील सर्व निवडणूका एकत्र घेण्यासंदर्भात अनेकदा चर्चा होताना दिसल्या. मात्र आता ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचे अनेकदा या धोरणाचे समर्थन केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे देशातील ‘एक देश एक निवडणूक’ ही चर्चा वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ( Ajit Pawar supports PM Narendra Modi One Nation One Election Policy )
केंद्र सरकारचा निर्णय काय?
केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय जाहीर केलाय. ज्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ‘एक देश – एक निवडणूक’ हे तत्व देशात प्रत्यक्षात अंमलात येऊ शकतं का? असल्यास त्यासाठी कोणत्या तरतुदी, उपाययोजना कराव्या लागतील यासंदर्भात आढावा घेऊन शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे.
अजित पवार यांचं समर्थन
केंद्राच्या या निर्णयाचा अनेक पक्षांकडून, नेत्यांकडून विरोध होत आहे. परंतू महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या धोरणाचे समर्थक केले आहे. तसे ट्विट अजितदादांनी केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की; “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल. प्रधानमंत्री महोदयांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.”
प्रधानमंत्री आदरणीय @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 1, 2023
“काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय मोदी जी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो.” असे अजित पवार म्हणाले आहेत. ( Ajit Pawar supports PM Narendra Modi One Nation One Election Policy )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक
– “बिबट्या वैरी नाही तर शेजारी…”
– मावळ तालुक्यातील 47 गावांतील पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर; पाहा आरक्षणासह गावांच्या नावांची संपूर्ण यादी