मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेल्या शिवली गावामध्ये अत्यंत भक्तीभावात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. दिनांक 14 मार्च रोजी या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण वाचन होणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहात विविध कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळे मोठ्या प्रमाणात सहभाग होत आहेत. ( Akhand Harinam Saptah At Shivali Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. तसेच दिनांक 15 मार्च रोजी दुपारी निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आलेला आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन ह.भ.प, शंकर महाराज आडकर, बाळासाहेब आडकर, पोलीस पाटील संदीप आडकर, माजी सरपंच रमेश आडकर, युवा नेते ज्ञानेश्वर किसन आडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कमिटीच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या वातावरणात संपन्न होत आहे, अशी माहिती संदीप आडकर यांनी दिली.
अधिक वाचा –
– वडगाव इथे मावळ दुर्गा अभियान स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ; 50 हून अधिक मुलींचा सहभाग
– वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – गडकरी