व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्व प्रस्तावित कामे 31 जुलैच्या आत सुरू करण्याचे नियोजन करावे - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 22, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता, सर्व कार्यान्वित यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत प्रस्तावित कामांना २५ जूनपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन ३१ जुलै २०२५ च्या आत प्रस्तावित कामे सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत जितेंद्र डुडी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजाजन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी आपले प्रस्तावास तात्काळ तांत्रिक मान्यता घ्यावी आणि २५ जून पूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन सर्व प्रस्तावित कामे ३१ जुलै, २०२५ च्या आत सुरू करावीत, डिसेंबर २०२५ अखेर सर्व कामे पूर्ण करावीत. वरिष्ठ स्तरावरून घ्यावयाच्या मान्यतांसंदर्भात पाठपुराव्याकरिता यंत्रणांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले.

तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ‘नाविन्यपूर्ण योजना ‘यामध्ये नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन शाखेत तात्काळ सादर करावेत. या संदर्भात कृषी, महिला व बालविकास, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्ण विभाग, शिक्षण, पोलीस आदी विभागांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची मागणी नोंदवून प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर राज्य शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून यामध्ये सर्व विभागांनी आपापला सहभाग नोंदवून जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.

यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागांना एक कोटी उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागासाठीच्या उद्दिष्टांचे विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), पुणे यांनी कार्यक्रम नियोजनाचे सादरीकरण केले. बैठकीला सर्व कार्यान्वित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime


Previous Post

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले ; ‘नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

Next Post

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी 'एमएसआरडीसी'चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.