Dainik Maval News : वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साते गावच्या ब्राह्मणवाडी येथे ब्रेझा कार आणि टेम्पो यांच्यातील अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या ब्रेझा कारने महामार्गालगत उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने हा अपघात झाला व कारमधील दोघांचा मृत्यू झाला.
ताविश जावेद अहमद (वय 24 वर्षे, रा. बिहार) आणि राशीद सोहराब खान (वय 24 वर्षे, रा. मोशी ता. हवेली, पुणे) असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर, दिलशाद नियाज खान (वय 25 वर्षे रा. मोशी, पुणे), महम्मद शाहीद रिझवी (वय 24 वर्षे रा. बिहार), झिशान कलाम शाहीद (वय 24 वर्षे रा. बिहार) आणि फैझान मुस्ताक खान (वय २४ वर्षे, रा. मोशी, पुणे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
- पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रविवारी (दि.2) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ब्राम्हणवाडी – साते गावच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गावर मुंबई बाजुकडून पुणे बाजुस जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. चालक फैझान मुस्ताक खान याने त्याच्या ताब्यातील ब्रेझा कार (क्रमांक एमएच 12 एक्सई 5083) भरधाव वेगात चालविली. यात कार अनियंत्रित झाल्याने महामार्गालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पो (क्रमांक एमएच 04 एचवाय 3179) यास धडक दिली.
अपघातात ताविश जावेद अहमद, राशीद सोहराब खान हे गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू पावले. तर कार चालक फैझान मुस्ताक खान व कारमधील दिलशान नियाज खान, महम्मद शाहीद रिझयी, झिशान कलाम शाहीद हे जखमी झाले. या संदर्भात खंडाप्पा बसराज हारकुडे यांनी फिर्याद दिली असून कार चालक फैझान मुस्ताक खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर