Dainik Maval News : पवन मावळ भागातील वाघेश्वर येथील प्रसिद्ध श्री शिवमंदिरातील प्राचीन घंटा चोरीला गेली आहे. शुक्रवारी (दि.14) सकाळी ही घटना उघडकीस आली. वाघेश्वर येथील या शिवमंदिरातील 15 किलो वजनाची घंटा अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी लक्ष्मण गुरव यांनी गुरुवारी (दि.12) सायंकाळी दिवाबत्ती केली. त्यानंतर ते घरी निघून गेले. दुसर्या दिवशी सकाळी ते मंदिरात पूजेसाठी गेले असता तिथे मंदिरातील घंटा चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब जवळच्या लोकांना सांगितली आणि ताबडतोब पोलिसांना कळविले.
प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी देखील वाघेश्वर येथील या मंदिरात चोरी झाली होती. तेव्हा देवाचे प्राचीन मुखवटे व अन्य वस्तुंची चोरी झाली होती. नंतर त्यातील काही वस्तू मंदिर परिसरात सापडल्या होत्या. यंदाही चोरी झाली असून मोठी प्राचीन घंटा चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती पुजारी लक्ष्मण गुरव यांनी दिली आहे.
वाघेश्वर येथील हे शिवमंदिरत परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या शिवमंदिराजवळ महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. त्यामुळे अशा श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी वारंवार चोरी होत असल्याने मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime
– मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News
– जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव