Dainik Maval News : देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बेवारस स्थितीत व अपघातातील पडून असलेले दुचाकी वाहने नागरिकांनी कागदपत्राची पूर्तता करून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांनी शासकीय कामकाज प्रक्रीया सुलभ करण्यासाठी व नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी सात कलमी कृती आराखडाच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार देहुरोड पोलीस ठाण्याच्या आवारात अपघातातील, बेवारस स्थितीतील वर्षानुवर्षे पडलेल्या वाहनांचे निर्गतीबाबत कळविण्यात आले होते.
अशा वाहनांमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरत असून गुन्ह्यातील दुचाकी व चारचाकी वाहने व इतर मुद्देमाल ठेवण्यास जागेची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे देहूरोड ठाण्यातील बेवारस 94 दुचाकी वाहने ओळख पटवून व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन घेवून जाण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News