Dainik Maval News : गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी एकाला पिस्तूल दाखवून तलवार व लाकडी दांडक्याने डोक्यात व शरीरावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी 5:15 वा. निगडे ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडला. जखमी फिर्यादी संतोष मारुती करवंदे वय 40 रा. कल्हाट ता.मावळ जि.पुणे यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष महादु जाचक (वय 35, रा. स्वराज्य नगरी फ्लॅट नं 4, स्वामी दर्शन अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे मूळ रा . करवंदे वस्ती कल्हाट ता. मावळ जि. पुणे), आदिनाथ लाला खापे (वय 27 रा. कोंडीवडे ता. मावळ जि.पुणे), रोहन मुरलीधर आरडे (वय 23) व ओमकार देविदास खांडभोर (वय 23) दोघे रा घाटेवाडी पोस्ट वडेश्वर ता. मावळ जि.पुणे गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.
- पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे (ता मावळ जि पुणे) हद्दीत डांबरी रोडवर फिर्यादी हे तानाजी भगवान करवंदे, विनोद दादाभाऊ कोयते व नवनाथ बापु देशमुख असे कार एम. एच. 14 एल. वाय 2842 मधुन कल्हाट कडे जात असताना, आरोपी संतोष जाचक, अधिनाथ खापे, रोहन आरडे व ओमकार खांडभोर आदींनी गावच्या यात्रेत झालेल्या वादाचे कारणावरून संगनमत करून त्यांचेकडे असलेले स्विफ्ट कार ही फिर्यादीच्या कारला आडवी मारून फिर्यादीची गाडी थांबवुन गाडीच्या काचा फोडुन संतोष महादु जाचक याने फिर्यादीला त्याचेकडील पिस्टल दाखवून गाडी मधुन खाली उतरण्यास भाग पाडले.
आरोपी संतोष जाचक व तिघांनी तलवार व लाकडी दांडक्याने फिर्यादीला डोक्यावर व शरिरावर ठिकठिकाणी वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. जखमी संतोष करवंदे यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले.
वडगाव मावळ पोलिस स्टेशन गु.र.नं 64/2025 भारतीय न्याय संहिता अधि सन 2023 चे, कलम109,189(2),189(4), 191(3),191(2),190,324(4),126(2), 352, 351(2) आर्म अँक्ट 3(25), 4(27) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त