मागील काही दिवसांपासून जागा हस्तांतरण प्रक्रियांमुळे काही काळ ठप्प राहिलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम आता मात्र मोठ्या वेगाने सुरू झाले आहे. लवकरच हा पुल वाहतूकीसाठी खुला होणार आहे. आंदर मावळातील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी या पुलाचे काम हाती घेण्यात आले असून नवीन पुलामुळे या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे याठिकाणी रोजगार वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच आंदर मावळातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सदर पुलाच्या कामासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र नदीवरील पुल मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने ज्या ठिकाणी जोडला जात आहे, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. टाकवे बुद्रुक कडून कान्हेफाटा या दिशेला जाताना ज्या ठिकाणी नदी वरील पुलाचा रस्ता मुख्य टाकवे कान्हे रस्त्याला जोडला गेला झाला आहे, त्याठिकाणी धोकादायक तीव्र वळण निर्माण झाले आहे. परिणामी या भागात अपघाताची मालिका सुरू होऊ शकते. असे या भागातील अनेक नागरिकांचे मत आहे. ( Andar Maval Takve Budruk Indrayani River Bridge work is starting fast )
तसेच कान्हे फाट्याच्या बाजूने टाकवेच्या दिशेने येताना याच भागामधून पारवडीकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना यु टर्न घेणे शक्य होणार नाही. या वाहनांना यु टर्न घेण्यासाठी किमान एक ते दीड किलोमीटर पुढे कायनेटिक कंपनी चौकामध्ये येऊन यु टर्न घेऊन माघारी नदीवरील जुन्या पुलापर्यंत येऊन पारवडी व पुढील भागात जावे लागणार आहे. दरम्यान या भागात वेळेतच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
कान्हे रस्त्याने टाकवे गावाच्या दिशेने येताना वाहने नदी वरील पुलावरून मार्गस्थ होताना त्याठिकाणाहून दोन्ही बाजूने वाहनांच्या व वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग बसवणे आवश्यक आहे, असे या भागातील वाहन चालकांचे व प्रवासाची नागरिकांचे म्हणने आहे.
‘सार्वजनिक बांधकामाच्या अपूर्ण नियोजनामुळे दोन्ही भागात तीव्र चढउतार वळण झाल्यामुळे अपघाताची शक्यता नाकरता येत नाही. येणाऱ्या काही दिवसात रस्ता सुरू झाल्यानंतर या भागात अपघात होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वोपरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या भागात अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ राहील.’ – माजी उपसरपंच रोहिदास असवले.
‘टाकवे बाजूने कान्हे फाट्याकडे जाताना तीव्र उतार व धोकादायक वळण या ठिकाणी निर्माण झाले आहे. या भागातील तीव्र वळण व उतार कमी करण्यासाठी व पारवडी व त्या पुढील गावाना जाण्यासाठी याठिकाणी सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ व सदर ठेकेदार यांनी या रस्त्याच्या संदर्भात असणाऱ्या समस्या तत्काळ सोडवाव्यात.’ – सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय असवले.
‘आंदर मावळ मधील 60 ते 70 गावांना जोडणारा हा मुख्य एकमेव रस्ता आहे. तसेच टाकवे बुद्रुक येथे औद्योगिक वसाहत आहे. या भागात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रसह बाहेर राज्यातील अनेक पर्यटक दाखल होत असतात. तसेच आंदर मावळ भागातील अनेक नागरिक विद्यार्थी, व्यवसायिक, महिला वर्ग याच रस्त्याने प्रवास करत असतात या रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणावरती वर्दळ आहे. नदीवरील पुलापासून दोन्ही बाजूने मुख्य रस्त्याला जोडल्या जाणाऱ्या ठिकाणी डांबरीकरण करण्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ व सदर ठेकेदार यांनी या ठिकाणच्या रस्त्या संदर्भातील सर्व समस्या सोडवाव्यात.’ – सेवा फाउंडेशन माजी अध्यक्ष चंद्रकांत असवले.
अधिक वाचा –
– जिल्हा बँकेच्या संचालकांवर दोन वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही!
– आरपीआय आठवले गटाचे सूर्यकांत वाघमारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड । Pune District Planning Committee
– मराठा समाजही मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार! प्रत्येक गावातून असणार ‘इतके’ उमेदवार । Maval Lok Sabha Election 2024