Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा वार्षिक उत्सव आज, रविवार (दि. 30 मार्च) पासून सुरू होत आहे. देवाचा अभिषेक, बैलगाडा स्पर्धा, छबिना पालखीसह ग्रामप्रदक्षिणा, निकाली कुस्ती स्पर्धा, भंडारा, लोकनाट्य तमाशा, नाट्यरुपी भारुड, आर्केस्ट्रासह विविध कार्यक्रमांसह रविवार, दिनांक 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत उत्सव साजरा होणार असल्याची माहिती श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती आणि श्री डोळसनाथ महाराज मंदिर नवनिर्माण समितीने दिले.
दिनांक 30 मार्च रोजी, पहाटे श्रींचा अभिषेक, सायंकाळी श्री नाथाच्या पालखीचे ग्राम प्रदक्षिणेसाठी प्रस्थान, रात्री घोरावडी स्टेशन मैदानावर मंगला बनसुडे सह नितीनकुमार बनसोडे यांचा कृष्णा काठाचा फरारी या वगासह लोकनाट्य तमाशा, तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोर ओझर्डे गावच्या गुरुदेवदत्त प्रासादिक नाट्यरूपी रंगीत, संगीत भजनी भारुड मंडळाकडून सुडान पेटला परशुराम या वागाव्दारे संपन्न होणार आहे.
- दि. 30 रोजी व 31 रोजी येथील गणपती माळावर भव्य बैलगाडा स्पर्धा, यामध्ये प्रथम क्रमांक 1 लाख 25 हजार, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये, तृतीय क्रमांक 75 हजार, चतुर्थ क्रमांक 51 हजार रुपयाची रोख बक्षिसे पहिल्या व दुसऱ्या दिवशी बुलेट,एलईडी टीव्ही कुलर, चषक व देणगी स्वरूपात अनेक मान्यवराकडून रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.
मंगळवारी, दिनांक 1 एप्रिल रोजी सुमारे 8 लाख 8 हजार 888 रुपये इनामाच्या एकूण 51 निकाली कुस्त्या तसेच यामध्ये महिला कुस्तीपटूंच्या देखील निकाली कुस्त्या सायंकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत भोईआळी मळा येथे होणार आहेत. या कुस्ती मैदानामध्ये अनेक रोख बक्षिसासह चांदीच्या गदा व इतर रोख बक्षिस मान्यवरांनी जाहीर केली आहेत.
तसेच दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता राधा पाटील मुंबईकर यांचा गाण्याचा कार्यक्रम मारुती मंदिर चौक येथे होणार आहे. दिनांक 3 रोजी ऑल दि बेस्ट हिंदी मराठी लोकगीत, लावण्या रिमिक्स गाण्यासह श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोर आर्केस्ट्रा चा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सर्व कार्यक्रमांना सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती, श्री डोळसनाथ महाराज मंदिर नवनिर्माण समिती यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा