Dainik Maval News : सर्व महाविद्यालयांना आपल्या महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्रा स्थापन करण्याकरिता २० सप्टेंबर अखेर विहित नमुन्यात अर्ज सादर करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
जिल्ह्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्याशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार श्वेता पवार, उच्च शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक यांच्यासह जिल्ह्यातील एकूण २१६ महाविद्यालयांनी उपस्थित होते.
या कार्यशाळेत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून आज सुमारे दहा ते पंधरा महाविद्यालयांचे अर्ज प्राथमिक स्वरूपात प्राप्त झालेले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– आता शेतात पोहचणे झाले सोपे, मावळातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश । Maval Taluka