Dainik Maval News : वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या आवारात काही बेवारस वाहने पडून असून, या वाहनांच्या मूळ मालकांनी आपल्या वाहनांची ओळख पटवून सात दिवसात ही वाहने घेऊन जावीत. अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली आहे.
वडगाव मावळ पोलीस स्टेशन परिसरात चार ऑइल वाहतुकीचे ट्रक (टँकर) पडून असून त्यांचे वाहन क्रमांक व चॅसीस क्रमांक दिसून येत नाहीत. या बेवारस वाहनांची मुद्देमाल निर्गती मोहिमेअंतर्गत विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर वाहनांच्या मूळमालकांनी आपल्या वाहनाची ओळख पटवून मूळ आर. सी. बुक व आधारकार्डसह सात दिवसांच्या आत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम तसेच मुद्देमाल कारकून पोलिस हवालदार संदीप बंडाळे यांच्याशी संपर्क साधावा व आपले वाहन घेऊन जावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक कदम यांनी केले आहे.
अन्यथा आपण वाहन ताबा घेण्यास इच्छुक नाही, असे समजून या वाहनांबाबत कायदेशीर कारवाई करून लिलाव करण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाबाबत पीएमआरडीए कार्यालयात विशेष आढावा बैठक संपन्न
– मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार । Maratha Reservation
– आनंदाची बातमी ! ‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू ; सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची संधी