मावळ तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या 4 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात साळुंब्रे, डोणे, आढले आणि उदेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर पुढील महिन्यात आंबळे, शिळींब आणि लोहगड या तीन ग्रामपंचायतींवर तसेच मे महिन्यात भाजे, मुंढावरे, सांगिसे या तीन ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ( Appointment of Administrators at 4 Gram Panchayats in Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आढले ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 3 जानेवारीला संपला, तर साळुंब्रे आणि डोणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 4 जानेवारी रोजी संपला. त्याठिकाणी गट विस्तार अधिकारी एन. जे. ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर उधेवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 जानेवारी रोजी संपला असून त्याठिकाणी एस. के खांडेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– ‘तुकोबारायांना त्यांची पत्नी मारायची, म्हणून…’, बागेश्वरधामच्या धीरेंद्र महाराजाचे वादग्रस्त विधान; तुकोबांचे वंशज म्हणाले…
– मोठी बातमी! जवण-तुंग रोडवर अपघात, थेट शेतातील विहिरीत कोसळली कार