Dainik Maval News : वैशाख महिना संपत असताना सर्वांनाच पावसाचे आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारी सोहळ्याचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी वारी सोहळ्यासाठी खुप दिवस अगोदर पासून तयारी केली जाते. त्यातही श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन होत असते, काही दिवसांपूर्वीच दोन्ही संस्थानकडून पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता संत तुकाराम महाराज संस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे.
यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे 340 वे वर्ष आहे. यावर्षी देहू संस्थांनकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथला ओढण्यासाठी स्वतःची म्हणजेच संस्थानाच्या मालकीची बैलजोडी खरेदी करणार आहे.
दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोडयांना हा मान दिला जायचा. मात्र, यंदाच्या वर्षी बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराजांच्या पालखी रथाला संस्थानने स्वतः खरेदी केलेली बैलजोडी असणार आहे.
देहू संस्थानने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पासून बैलजोडी साठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहेत. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर पुढे नेण्याचा देखील मानस आहे, असे नितीन महाराज मोरे यांनी सांगितले.
दरवर्षी बाहेरुन बैलगाडी मागवण्याची परंपरा आहे. परंतु आता देहू संस्थानतर्फे घेण्यात आलेल्या नवीन निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरु असलेली बैलजोडी मागवण्याची परंपरा खंडित होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यात देहू संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश