Dainik Maval News : ऑटोरिक्षा इलेक्ट्रॉनिक मीटर्सच्या पुन:प्रमाणीकरणाची (कलिब्रेशन) वैधता संपल्यानंतर अथवा भाडे सुधारणेनंतर मीटरचे पुन:प्रमाणीकरणाच्या तडजोड शुल्कात घट करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्राधिकरणाचे सचिवांनी कळविले आहे.
मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेतल्यास मुदत समाप्तीनंतर प्रत्येक एक दिवस विलंबासाठी किमान 1 दिवस आणि एकूण कमाल परवाना निलंबन कालावधी 10 दिवस राहणार आहे. परवाना निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रूपये मात्र कमाल तडजोड शुल्क 500 रूपयांपर्यंत असेल.
सर्व ऑटोरिक्षा चालक, मालक यांनी ऑटोरिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन व मीटर तपासणी 31 जानेवारी 2025 पर्यंत करुन घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड प्रकल्पाचे अद्यापही 200 हेक्टर भूसंपादन बाकी, ‘या’ जमीन मालकांना मिळणार 25 टक्के भरपाई । Pune Ring Road
– दोन्ही राष्ट्रवादी एकत्र… आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने खळबळ, राज्यभर होतीये चर्चा । MLA Sunil Shelke
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी