चमत्कार आणि मनातलं ओळखणं अशा भोंदूगिरीमुळे आधीच वादात अडकलेल्या धीरेंद्र महाराज यानी आता अतिशय निंदाजनक आणि वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रासह देशातील लाखो वारकरी बंधू-भगिनी यांच्याकरिता पुज्यनीय असलेले, महाराष्ट्रातील संतमालिकेतील संतश्रेष्ठ आणि वारकरी संप्रदायाचे कळस असलेले जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्याबद्दल आणि त्यांच्या पत्नीबद्दल धीरेंद्र महाराज याने अत्यंत निंदनीय वक्तव्य केले आहे. त्याच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. ( Bageshwar Dham Dhirendra Maharaj Controversial Statement On Shri Saint Tukaram Maharaj )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटलंय धीरेंद्र महाराजाने?
“संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा केला. त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का? त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा आहे. ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारी बायको मिळाली असती तर मी देवाचा धावाच केला नसता,” अशी मुक्ताफळे धीरेंद्र महाराज याने उधळली आहेत.
तुकाराम महाराज यांच्या वंशजांकडून इशारा…
धीरेंद्र महाराजाच्या या वक्तव्याचा राज्यातून सर्वत्र निषेध होत आहे. संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज प्रशांत महाराज यांनीही धीरेंद्र महाराजाच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. “बागेश्वर बाबा सारखे अनेकजण संतांवर अवमानकारक वक्तव्य करून चरित्र हनन करत आहेत. बागेश्वर बाबांना आवाहन करतो की, त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांच्या विरोधात आंदोलन करत गुन्हा दाखल करू”, असा इशारा प्रशांत महाराज यांनी दिला आहे.
अधिक वाचा –
– चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा जोतिबा फुलेंसोबत तुलना; म्हणाल्या…
– मोठी बातमी! कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात – पाहा व्हिडिओ