Dainik Maval News : ताजे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब पंढरीनाथ पिंपरे, तर उपाध्यक्ष पदी सुमन शंकर केदारी यांची निवड करण्यात आली आहे. वडगाव निबंधक कार्यालयात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत विहित वेळेत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक – एक अर्ज आले, त्यामुळे अध्यक्षपदी पिंपरे, तर उपाध्यक्षपदी केदारी यांनी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
- सहाय्यक निबंधक आर. के. निखारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि संस्थेचे सचिव संभाजी केदारी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. यावेळी संचालक काळुराम केदारी, भाऊसाहेब गरुड, जयशिंग गरुड, शाम केदारी, मच्छिन्द्र केदारी, संतोष केदारी, गोरख मोहिते, भानुदास ढमाले, रुपचंद गायकवाड, ताराबाई गरुड उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शंकर केदारी, रमेश सुतार, भानुदास येवले, सोमनाथ केदारी, भाऊ केदारी, लाला कुटे, मिलिंद गरुड, वामन गरुड, विजय गरुड, रामदास गायखे, दत्तात्रय आंद्रे, शिवाजी केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश