बुधवार, 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा ‘भारतरत्न जे आर डी टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ मावळ तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी दुपारी चार वाजता, ऑटो क्लस्टर सभागृह सायन्स पार्क समोर रांगा ज्वेलर्स समोर मुंबई पुणे रस्ता चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे. मावळवासीयांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रामदास आप्पा काकडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. ( Bharat Ratna J R D Tata Udyog Ratna Award announced to Entrepreneur Ramdas Kakde )
रामदास काकडे यांच्यामुळे मावळ तालुक्यामध्ये उद्योगाची गंगा वाहू लागली. तळेगाव दाभाडे एमआयडीसी भागाच्या विकासातही रामदास काकडे यांचे सर्वाधिक योगदान आहे. तळेगाव एमआयडीसीमध्ये अनेक बहुराष्ट्रीय तसेच वैविध्यपूर्ण कंपन्यांचा उद्योग व्यवसाय मोठ्या डौलाने उभा आहे, त्याचे श्रेय रामदास काकडे यांना जाते. अत्यंत गरिब परिस्थितीमध्ये अनेक उपेक्षा, अडीअडचणी सहन करत जिद्दीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभा करून अनेक बेरोजगार तरुणांना व्यवसायाची आवड निर्माण करून देण्याचे कार्य रामदास काकडे यांच्या हातून घडले.
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा लिलया उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच रामदास आप्पा काकडे. राजकारणाचा खरा ध्यास समाजकारणासाठीच झाला पाहिजे अशी कटाक्षाने भूमिका मांडणारा खरा व्यक्ती म्हणजे रामदास आप्पा काकडे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी परावृत करण्याचे काम रामदास काकडे यांनी केले आहे.
माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनानुसार इंद्रायणी महाविद्यालयाची सर्वतोपरी वाटचाल यशस्वीपणे रामदास काकडे यांनी करून दाखवलेली आहे. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी आखून दिलेल्या चौकटीमध्येच इंद्रायणी महाविद्यालय डौलाने उभे आहे, याचा सार्थ अभिमान मावळ तालुक्याला आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे परंतु पुण्याच्या धरतीवरती वैविध्यपूर्ण कोर्सेस इंद्रायणी महाविद्यालयातही उपलब्ध झाले आहेत. जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्याची सुविधा इंद्रायणी महाविद्यालय मध्ये उपलब्ध आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी अत्यंत अभिमानाने इंद्रायणी महाविद्यालयाचे नाव सर्वत्र घेत आहेत याचे सारे श्रेय हाडाचा शिक्षक असलेल्या रामदास काकडे यांनाच जाते. ( Bharat Ratna J R D Tata Udyog Ratna Award announced to Entrepreneur Ramdas Kakde )
इंद्रायणी महाविद्यालयाचा विकास करत असताना परिणामी पदर मोड करून कार्य पुढे चालू ठेवलेल सर्व मावळ वासीयांनी डोळ्यांनी बघितलेल आहे. विनम्र व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान प्रतिभा, प्रशासनावर असणारी पकड ,कुशल कार्यपद्धतीचा दांडगा अनुभव, अत्यंत जमिनीवर राहून काम करण्याची सचोटी, या सर्व गुणांमुळे रामदास काकडे यांचे व्यक्तिमत्व काहीस वेगळच आहे याची विलक्षण अनुभूती होते. या सर्व गुणांचा आणि कार्यपद्धतीचा गौरव म्हणूनच रामदास काकडे यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित केलं असेल.
माहिती-शब्द स्त्रोत – मिलिंद अच्युत
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडून पवना धरणाचे जलपुजन; पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर इथे वृक्षारोपण
– रास्त भाव दुकान परवान्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, 1 सप्टेंबरपर्यंत मुदत । Pune News
– काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?