Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरातील सुभाष चौक येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधण्यासाठी सुमारे 3 कोटी 82 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला असून या इमारतीचा भूमिपूजन समारंभ (शुक्रवार दि.11) संपन्न झाला. या इमारतीचे काम दर्जेदार व जलद गतीने करण्याच्या सूचना आमदरांनी संबंधितांना दिल्या आहेत.
यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले की, शहरातील नागरिकीकरण दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे पोलीस यंत्रणेवर देखील ताण येतो. पोलिसी कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणेसह सुसज्ज इमारत असणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी मध्यवर्ती ठिकाणी गाव भागात ही इमारत आकाराला येत आहे, याचा नक्कीच आनंद आहे.
या भूमिपूजनास तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश चौधरी, यादवेंद्र खळदे, दिलीप खळदे, बाबुलाल नालबंद, रामभाऊ गवारे, मनोहर दाभाडे, संजय बाविस्कर, संकेत खळदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकारी आदि. उपस्थित होते.

 
			






