Dainik Maval News : सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, महावितरण व वन विभागाची आढावा बैठक बुधवारी (दि.११) रोजी पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या विकासकामांना गती द्यावी, अशा स्पष्ट सुचना आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तालुक्यातील विकासकामांना गती मिळण्यासाठी वन विभागाकडुन सहकार्य आवश्यक आहे. स्मशानभूमी,रस्ते यासाठी वन विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळाव्यात. त्यासाठी पत्रव्यवहार अथवा कागदपत्रांची पूर्तता संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने करावी.
तसेच ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील वनविभागाच्या हद्दीतील कामांना देखील गती मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. ज्या कामांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते तातडीने सादर करावेत. इतर विभागांशी समन्वय ठेवून कामे मार्गी लावावीत अशा सूचना वन विभागाला दिल्या आहेत.
वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध झाला झाला आहे. त्या कामातील तांत्रिक बाबींची पूर्तता करून कामास सुरुवात करावी. या वीज उपकेंद्रामुळे आंदर मावळातील विजेचा प्रश्न सुटून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच नवीन ज्या कामांना निधी उपलब्ध आहे ती कामे त्वरित सुरू करावीत, असे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जलसंपदा विभागाअंतर्गत येत असलेले कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व पुलांची कामे त्वरित पूर्ण करून पुल वाहतुकीसाठी खुले होणे गरजेचे आहे. तसेच जुन्या बंधाऱ्यातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करावेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करु, असे अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेदरम्यान आमदार शेळके यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News