मावळ तालुक्याचे तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव नगरपंचायत मध्ये सध्या विविध विकास कामे सुरु आहेत. यात प्रामुख्याने रस्त्यांची विकासकामे मोठी जोरात सुरु आहेत. परंतू, रस्त्यांचे बांधकाम आणि दर्जा यावरुन सातत्याने विरोधी भाजपाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत, आणि अशातच शहरातील एका काँक्रिटच्या रस्त्याचे चेंबर खराब झाल्याचे समोर आल्याने संबंधितांवर जोरदार टीका होत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच भाजपाकडून, “वडगाव नगरपंचायत विकास कामात भोंगळ कारभार. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सत्ताधारी टक्केवारीत व्यस्त” असा आरोपही लगावण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक सात आणि आठ मधून जाणाऱ्या काँक्रीट रस्त्यावरील एक चेंबर खराब झाले आहे. ( BJP alleges that Vadgaon Nagar Panchayat Maval Taluka road works are substandard and deteriorating )
रस्ता काँक्रीट होण्याआधीच अशी अवस्था असेल तर अजून रस्ता काँक्रीट झाल्यावर त्यावरून वाहनांचे ये जा सुरु झाल्यावर काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित ठेकेदारावर सत्ताधारी स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन का डोळझाकपणा करत आहेत, असा रोकडा सवालही भाजपाकडून करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारावर कार्यवाही होऊन काळ्या यादीत टाकवे, अशी मागणी देखील वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे यांनी नगर पंचायत सीईओ प्रविण निकम यांना संबंधित चेंबरचे फोटो पाठवून आणि फोनद्वारे संपर्क करून केली आहे, अशी माहिती अनंता कुडे यांनी स्वतः दैनिक मावळला दिली.
अधिक वाचा –
– नातवासाठी कायपण! मावळात चिमुकल्याच्या नामकरण सोहळ्याला भरवला कुस्त्यांचा आखाडा; इनामात दुभती म्हैस अन् चांदीची गदा
– महिलांनी आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर । Talegaon Dabhade News