Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी कडून मंगळवारी (दि. १३ मे) महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून एक ५८ जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यात पुणे जिल्हा भाजपाच्या पुणे उत्तर मावळ जिल्हाध्यक्षपदी प्रदीप विद्याधर कंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी कोकण ,पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई यांसह जवळपास 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात पुणे जिल्ह्यातील उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदीप कंद यांची निवड झाली आहे. पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर प्रदीप कंद यांना निवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोण आहेत प्रदीप कंद?
प्रदीप कंद हे भाजपाचा एकनिष्ठ शिलेदार आहेत. एक सामान्य कार्यकर्त्यापासून ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहेत. पुणे जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा बहुमान एकाच वेळेस मिळविणारे कंद हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून परिचित आहेत हवेली तालुक्यातील प्रदीप कंद यांच्या निवडीमुळे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजपाची ताकद आणखीन मजबूत झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार फायदा
प्रदीप कंद हे ग्रामीण भागात कार्यरत असणारे नेते असून त्यांचा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या निवडीचा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला चांगला होईल.
अभ्यासू नेता अशी ओळख
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रदीप कंद यांनी सातत्याने प्रयत्न केलेत. तसेच अन्य तालुक्यांमधील विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच भूमिका घेतली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई