उर्फी जावेद हिच्यासोबत पंगा घेतल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ या चर्चेत आहेत. मात्र, सध्या चित्रा वाघ उर्फीमुळे नाहीतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या असून त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
चित्रा वाघ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना चक्क महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत असून विरोधी पक्ष आज (30 जानेवारी) ठिकठिकाणी चित्रा वाघ यांच्याविरोधात आंदोलन करणार आहे. ( BJP Chitra Wagh Compare Minister Chandrakant Patil With Mahatma Jyotiba Phule In Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटल्या होत्या चित्रा वाघ? वाचा
पुणे येथे एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला चित्रा वाघ आल्या होत्या. तेव्हा मनोगतादरमान त्यांनी हे विधान केले. “काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते.” असे वक्तव्य आपल्या मनोगतादरम्यान चित्रा वाघ यांनी केले होते.
अधिक वाचा –
– लोणावळा शहर आणि परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी आणणार – खासदार श्रीरंग बारणे
– मावळ तालुक्यातील सांगिसे गावाजवळील जंगलात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ